निष्काम कर्म साधी , ही तोडी रे ! उपाधी

( चाल : राजास जी महली सौख्ये ... )
निष्काम कर्म साधी , ही तोडी रे ! उपाधी I
सुखदु :ख ते न मानी , अभिमान सोड  सारे ॥धृ o॥
संतासि शरण जाई, रत होइ नित्य पायी  ॥
त्यांची कृपाचि पाही, सायुज्य मुक्ति    ते   रे ! ॥१॥
भव जाण तोचि सारा, सायुज्यि नाही थारा ॥
आस पदचि खास वारा, ने पार त्याचिया रे ! ॥ २॥
अंकीत दास तुकड्या, चरणी तो लीन झाला ।।
सेवोनि नाम - प्याला, झाला सुखी  भला   रे ! ॥३॥