भक्त जाहले कितीक, पाहि पाहि रे !
(चाला रामनाम घ्या मनासि,, )
भक्त जाहले कितीक, पाहि पाहि रे ! ॥धृ०॥
ऊठ गङ्या ! झोप तुला लागली कशी ?
व्यर्थ मरसि अजुनि तुला शरम नाहि रे ! ।।१।।
बाळ ध्रुव राहि कसा, लावियला म्हणति ठसा ।
ज्ञानज्योत अजळूनिया जाइ रे ! ।।२॥
भक्त नामदेव खरा, करि प्रसन्न जगदुध्दरा ।
मंत्र खेचरी मिळवी, ब्रह्मि राहि रे ! ॥३॥
दास तुकडया तो शरण, न करि कधि नामस्मरण ।
होइ कैसे पाप - हरण ? नाम गाइ रे ! ॥४॥