औषधी घेइ़ नामाची
(चालः चल ऊठ भारता ! आता...)
औषधी घेइ़ नामाची I ना दग-दग हो ! पैशांची ।।धृ०।।
बिन पैशांची ही शेती । हरि तुज नेइल गृहि अंती ॥
नामेचि बहुत जन तरले ।
हरिचरणी रे ! उध्दरले ।
सेविती रामगुण - प्याले ।
हि वाट शोध सौख्याची । ना दगदग 0।।१।।
मायेने रोगी होता । यमपुरीत लाता खाता ॥
ना शरण जाय कुणि संता । ठेविती शरीरि अहंता ।।
केवि सत्य साधन होय ?
खेचरी - भुचरी सोय ।
भरवसा तनूचा काय I
गोडि घेई ब्रह्मरसाची । ना दगदग o ॥२॥
दृढ वाचे भजन करीसी । तव क्षणात तू उध्दरसी ।।
श्रीस्वामी अंकित दास । तुकड्यास लाभला भास ।।
राहती कितिक भजनात ।
होतसे तिथे प्राणान्त I
नसुनिही साच हो संत ।
स्मरताचि वाट स्वर्गाची I ना दगदग O ॥३॥