भजने करती तालसुरात येउनि मरती
(चालः असा धरि छंद जाइ...)
भजने करती तालसुरात येउनि मरती ॥धृ०॥
भक्तिविना ते भजनचि व्यर्थ ।
झाडाविण पर्वत जणु खात ।
प्रेम नसे हो ! जरि चित्तात I
भार भूवरती । तालसुरात 0 ॥१॥
जेवी पतिविण स्त्री नच शोभे ।
सालंकार जरि ती राबे I
नदि वाहे न दवाच्या थेंबे ।
जरी सुंदर ती । तालसुरात 0 ।।२।।
तुकड्या बोले मीहि तसा हो !
बनलो तालसुरात पिसा हो !
तुम्हि तरि चाखा भक्तिरसा हो !
भक्तिविण न गती I तालसुरात 0 ॥३॥