भक्ति भक्ती करा म्हणती म्हणति ते भक्ति करिती का ?
(चाल: मनाला स्थीर करवाया )
भक्ति भक्ती करा म्हणती म्हणति ते भक्ति करिती का ?
उगिच लोकास सांगोनी मारिती दिनभरी डाका ॥धृ०॥
कळेना देव तो कैसा म्हणति आम्ही जगा दावू ।
कशाने देव मिळतो हो ? म्हणे मारा सदा हा का ॥१॥
नसे सामर्थ्य ते काही शाप देईन हो ! म्हणती ।
लुटाया सर्व जनतेसी आपुला गाजविति डंका ॥२॥
दावुनी सोंग सिध्दीचे म्हणति सामर्थ्य हे अमुचे।
वाढवोनी जटादाढी जगाला मागती भीका ॥३॥
नसे लिनता कुठे शरिरी म्हणे मी साधु हो ! झालो ।
नसे साधु कैसे धुतले सहा ? हे कळतसे रंका ॥४॥
म्हणे तुकडया अहं गर्वे, बुडाले जगत हे सर्वे ।
अविनाशी स्वरुप बरवे, पहाया काढिती शंका ।।5।।