नाहि ज्यात कळवळा तो बोध द्वाड रे !
(चाल : नाम के अधार से कई लोग..)
नाहि ज्यात कळवळा तो बोध द्वाड रे !
विधुरल्या तुपात पाणी राहि का बरे ? ।।धृ०।।
बहु परोक्षज्ञान तरी स्वानुभव नसे ।
अपरोक्षावाचुनिया काय गोड रे ? ॥१॥
वाचतो पुराण सदा कीर्ति व्हावया ।
हरि कैसा भेटे ? मायाच आड रे ! ।।२॥
सांगतो जगात दानपुण्य मी करी ।
अभिमाने पुण्य व्यर्थ पाप जाड रे ! ।।३॥
हृदयि ज्याचिये दया नसेचि तिळभरी ।
करुनि साधनेहि काय ? द्वैत आड रे ! ॥४॥
जो धरील सत्संगति दीनसा भजे ।
सांगतसे तुकड्या हरि त्यासि काढि रे ! ॥५॥