केली केवढी ही क्षिती


                             गुरुदेव
केली केवढी ही क्षिती । नाही याची हो गणती ॥
आत वायु-आप-तेज । केली पृथ्वीची ती सेज ॥
पंचतत्वाचे हे घर । राहती जीव - शिव   सुंदर ॥
तुकड्या म्हणे घर केले। आत श्रीगुरु   बैसले ॥