मायेच्या आधारे गाईन मी तुज

मायेच्या आधारे गाईन मी तुज । मायेचेनि गुज  न   लाभेचि ।।
कैसी गाऊ कीर्ति नेणवे मजसी । रूप अविनाशी मायबापा !॥
अकल्पित गोष्ट कल्पो येई काय ? सांगा मज सोय गुरुराया !॥
म्हणे तुकड्यादास शरण मी आलो।कृपेसी लाधलो सद्गुरुच्या॥