आईबाप तूचि विघ्नहरा !

आईबाप तूचि विघ्नहरा ! माझा । त्वरित ये काजा बुद्धि द्याया 
नेणवे मजसी कोणते ते  ज्ञान ।  जिव्हाग्री   बैसोन   वदवाने l
तारी पतितासी हेचि गा ! मागणी । लोळती चरणी ऋषीमनी l
म्हणे तुकड्यादास नामाचे आधारे । काळ तो   थरारे  दरारी ।