उणे आम्हा काय विघ्नहरा !

उणे आम्हा काय विघ्नहरा ! दासा ? । थोर काळ खासा बांधू आम्ही ॥
धरोनिया भाव जाऊ पैलथडी । घालूनिया   उडी   भवनदी ॥
पाहता स्वरूप ग़जानना ! साचे । अनंत जन्माचे दोष जाती ॥
म्हणे तुकड्यादास अष्टसिद्धी दासी । स्वरूप अविनाशी गजमुखा ! ॥