पराची संगती नको मज आता
पराची संगती नको मज आता । त्राता गणनाथा वाचोनिया ॥
मंगल ही मूर्ती करी पूर्ण काम । असो दासा नेम कोणताही ॥
चर्चिला सेंदर सर्व अंगावरी । अष्टसिद्धी बरी नांदे तेथे !
म्हणे तुकड्यादास अधिकार ज्याचा । हरिहर देवांचा मान घेतो ॥