काढी ही कुबुद्धी श्री शारदा माई

काढी ही कुबुद्धी श्री शारदामाई ! । ठेवीन मी पायी डोई आता ॥
काय मी पामर वर्णू तुझे गुण ? । तारी हा अज्ञान सत्वरी गे ॥ 
महंतासी शांति देशी तू त्वरीत । तोडी आता भ्रांत नश्वराची ॥
म्हणे तुकड्यादास तवगुण महिमा । गावयासी सीमा नाही नाही ।।