नमन माझे हो शंकरा !
शंकर
नमन माझे हो शंकरा ! । आदिपुरुपा गौरीवरा ! ।।
भस्म लावोनी अंगासी । सदा वास स्मशानासी ।।
व्याघ्रचर्म आंथरूण । गळा मुंडमाळ जाण ।
तृतीय नेत्री अग्नी धरी । गंगा झरझर वाहे शिरी ॥
त्रिशूल ड्मरू धरोनि हाती । देई तुकड्यासी गा ! मती ।