कास लागू दे आपुली I
कास लागू दे आपुली । विटेवरचीये माऊली! ॥ धृ ॥
माझे डोळे ओढी तेथ । प् प्रेम लावी गे! नितांत ॥ १ ॥
संगुण रूप ते साजिरे । पाहू दे या नेत्राद्वारे ॥ २ ॥
तुकडया म्हणे जगज्जीवना! । नको दुरावू या दीना ॥ ३ ॥