नाशे कर्तव्य कल्पना I
नाशे कर्तव्य-कल्पना । बसता कृष्णा! तुझ्या ध्याना ॥ धृ ॥
किती नामे रूप तुझी । माप न होय सहजी ॥ १ ॥
किती भक्त किती खेळ । किती गोपी नि गोपाळ ॥ २ ॥
तुकड्या म्हणे तुझे जग । राहे निराळे सर्वांग ॥ ३ ॥