एक श्रोता येतो पुसायासी प्रश्न
एक श्रोता येतो पुसायासी प्रश्न ।
ऐकतां गहिंवरून जाय वक्ता ।।धृ॥
किती सांगो वाटे तया वक्तयासी ।
उल्हासे मानसी सांगावया ॥1॥
कांही श्रोते प्रश्न पुसायासी येती।
भाव नाही चित्ती तरिं ते व्यर्थ ॥2॥
तुकड्यादास म्हणे वक्ता दुःख पावे।
निंदकाच्या भावे रंग नाही ॥3॥