मी तो पामराची जात I
मी तो पामराची जात I
कैसा लावू तुझा अंत ? ॥ धृ ॥
न कळे मार्ग, कोठे जावे । तुज कैसेनि पहावे ? ॥ १ ॥
कोणाचिया संगे लावू । देह कोणापायी ठेवू ? ॥ २ ॥
तुकड्या म्हणे तूचि करी । इच्छा आमुची ही पुरी ॥ ३ ॥