आत असे तेचि निघे ।
आत असे तेचि निघे । काय बोलणे वाऊगे ॥ धृ ॥
आम्हा नाही तू भेटला । जीव पुरा नाही धाला ॥ १ ॥
ध्याने झाले समाधान । नाही उद्विग्न हे मन ॥ २ ॥
तुकड्या म्हणे नामी निशा । प्राप्त झाली जगदीशा ! ॥ ३ ॥