काय म्हणावे गोविंदा I
काय म्हणावे गोविंदा । जगच्चालक परमानंदा! ॥ धृ ॥ तूचि सगुण निर्गुण । योगियांचे मूळ स्थान ॥ १ ॥
तूचि भक्तांचा कैवारी । उभा झालास पंढरी ॥ २ ॥
तुकड्या म्हणे पुंडलीके । केले उपकार निके ॥ ३ ॥