मन आनंदाने भरले, जंव चरण गुरुचे दृढ धरले

( चाल : आले माझ्या दारी ! . . . ) 
मन आनंदाने भरले, जंव चरण गुरुचे दृढ धरले ॥धृ०॥ 
मम भाग्य उघडले, दैवी फुलहि फुलले । 
तो मूर्खपणा जन्माचा जावा कळले ।। 
जीवभावाने शिर नमले, जंव चरण गुरुचे दृढ   धरले ॥१॥ 
या सत्संगतीचा महिमा जाहिर बोले । 
यारे या ! हीनदीन कोणी जरीहि असले ।। 
एकहृदय हे ऐसे झाले , जंव चरण गुरुचे दृढ    धरले ॥२॥ 
संसार असारची दिसता , हे अनुभवले । 
या गुरुभक्तीने सार्थक सगळे झाले ।। 
तुकड्यादासा विश्वरुप स्फुरले, जंव चरण गुरुचे दृढ धरले ॥ ३॥