नच उणा पाहिरे तू कुणा ।

( चालः राग ; देश ; ताल ; तीनताल . ) 
नच उणा पाहिरे तू कुणा । 
नाहि या कुणी दुजा प्रभुविणा ! llधृ०॥ 
सकल विश्व हे त्यातचि भरले । 
व्यापुनि सकला आणिक उरले । । 
अंतर्मुख   होउनि   पाहिना ॥१॥ 
भेद समुळ हा जीवदशेचा । 
अज्ञानाचा गुण - दोषाचा । । 
दे झुगारुनि सर्व   कल्पना ! ll२ll
जे तुजपाशी ते इतरासी । 
मग का कोणा भिन्न पाहसी ? ।। 
उपभोगी आनंद  मन्मना ! ॥३॥ 
तुकड्यादासा प्रेम मिळाले । 
पूर्णातुनि या पूर्ण निघाले । । 
शेवट    पूर्णची   राहिना ! ।।४।। 
                         - गुरुकुंज आश्रम , दि . ०२ - ११ - १९५९