मज सवे बोल रे माधवा ।

( चाल : राग ; देश ; ताल : तीनताल . ) 
मज सवे बोल रे माधवा । 
नाही दुजा कुणि मजसी राघवा ! ॥धृ०॥ 
बहू दिवसाचा स्मरतो तुजला । 
पहाया तुज हा जीव भुकेला । 
वेळ न लावी    उगिच    आघवा ॥१॥ 
सोडुनि जव जाइल मज वाचा । 
सांगिल कैसा भाव जिवाचा ? 
म्हणतो म्हणूनिच वेळ नसावा ! ॥२॥ 
इंद्रिय हे जव गळतिल सारे ।
मग पाहू तुज कोण अधारे । । 
सगुण गुणाचा प्रेम हा    नवा ! ।।३।। 
तुकड्यादासा तुझा भरवसा ।
आजवरी मी   धरला   ऐसा ।। 
शेवट तव पदी देई    विसावा ! ।।४।। 
                          - गुरुकुंजआश्रम , दि . ०२ - ११ - १९५९