बहु झाली हळहळ , बडबड ऐकली अम्ही

( चाल : कैद में है बुलबुल . . . ) 
बहु झाली हळहळ , बडबड ऐकली अम्ही । 
मना लागे तळमळ , ही खळखळ करा कमी ।।धृ०॥ 
भोग सुख - दुःखे ही जन्मवरी चुकेना । 
अधिक वाढतिल तरी , जन्म - मरण मुकेना । । 
केले असेल जे जे ते चित्रगुप्त सोडीना । 
भोगल्यावाचून काही केल्या पाप मोडीना । । 
सर्वची कबूल , याचसाठी देतो हाक मी । 
मना लागे तळमळ ही , खळखळ करा कमी ।।१।। 
सरळ जीव व्हावा नि सरळ व्यवहार हा । 
इहलोक - परलोक सहज व्हाया उध्दार हा । । 
श्रमानेची भेटो परी व्हावा उद्धार हा । 
दुःखरुप संसार , नको वारंवार हा । । 
तुकड्यादास म्हणे , प्रभु मागतो वरदान मी ॥२॥ 
                   - घुडनखापा , चार्तुमास दि . २० - ०९ - १९५९