मज कुणि झणि , बोलु नका , उगीच त्रास देउ नका ।
( चालः सुर सुखखणी तु विमला . . )
मज कुणि झणि , बोलु नका , उगीच त्रास देउ नका ।
अविरत त्या प्रभु - चरणा , वाचुनि मन ओढु नका ।। धृ० ॥ ओढताति एकसरे , कामक्रोध दंभ भरे ।
लंपट या करित जिवा , नेऊ नका ! ॥ १ ॥
जन्मो - जन्मि अंतरलो , म्हणुनि दुःखी अम्हि झालो ।
सत् - संगतिने कळले , दिव्य सुखा ! ॥ २ ॥
स्वार्थाचे दिवस किती , सोडुनि ही जाइ मति ।
तुकड्याची प्रभु भक्ति , तोलु नका ! ॥ ३ ॥
- गुरुकुंज , दि . ०६ - ११ - १९५९