क्रांतीची ऐका भेरी , जी चुकतची नाही या भूवरी
( चालः सुख आले माझ्या . . . )
क्रांतीची ऐका भेरी , जी चुकतची नाही या भूवरी ॥धृ०॥
नव - मानव हा जागा होउनी पाहतो ।
हा विषय - तमाशा मुळिच जरा ना साहतो । ।
दरडाउनी देती ललकारी , जी चुकतची नाही या भूवरी ॥१॥ तो म्हणतो आम्ही एकची सारे होतो ।
निच - उच असे कधी देवाघरचे नव्हतो । ।
ती फिरुनी करु दुनिया सारी , जी चुकतची नाही या भुवरी ॥ २॥
सोडुनि ही व्यसने सरळपणाने राहु ।
तुकड्या म्हणे , सेवा - सहकार्याने जगवू । ।
या चंद्रावरती करु स्वारी , जी चुकतची नाही या भूवरी ।।३।।
- घुडनखापा , दि . २२ - ०९ - १९५९