धन - धन ! करी धन - ध्यास तुला

( चाल : बनबनकी बनवासी . . . ) 
धन - धन ! करी धन - ध्यास तुला, धन-भावापरि आस तुला ।
देईल काय रे धन मुक्ति मनाला | | धृ० ॥ 
किती जनांनी धन साठवुनी , जीवन सारे गमावले । 
गेले रे ते धन सोडोनी , थोडे ना सोबत नेले ! । 
समजूनी घे हा विचार सगळा , अहंकार करु नको खुला ॥१ ॥ हत्ती, घोडे , नोकर सारे , मानासाठी राबविशी । 
सुख ना देशी त्या मजुरांना , काम करुनिया तू घेशी ! 
हे भोगावे कधितरी लागे , घे समजोनी  का   भुलला ? ll २ ।। 
धन नोहे हे रक्त तयांचे , परीश्रमाने जे खपती - । 
तुझ्यावरी ठेऊनि भरवसा , स्वाधिन ते करुनी देती । । 
तुकड्यादास म्हणे तू त्याला , होऊ नको बेईमान मुला ॥ ३ ॥ 
           - घुडनखापा , दि . २९ - ०९ - १९५९