बलबल छलबल का करतो ? भोगासाठी मरमरतो ?

( चाल : बनबकी बनवासी रे . . . )
बलबल छलबल का करतो ? भोगासाठी मरमरतो ? 
त्यागावाचुनी कीर्ति कुणाची ! ॥ धृ० ॥
चारित्र्याने वाग म्हणावे , तिळभर काही ऐकेना । 
मनात येता खावे - प्यावे, केल्यावाचूनी राहवेना । । 
बेछूट हो ऐशा इसमांना , भिती   नसे   जन - लोकांची ॥ १ ॥ 
खोटा करुनिया व्यापार . पैसा कमवी भराभर ! 
बसावया मग मोटर - गाडी , जरतारी अंगावर ! ! 
लोक पाहनि हसति , म्हणती -  सारी कमाई पापाची  ! ॥ २ ॥ टिंगल करिती भर रस्त्यावर , गावातिल दिन दुबळ्यांची । 
दानाची जर वेळ पडे तर हा कैसा पडतो काची ! ! 
तुकड्यादास म्हणे  ऐशांना , कुठली    भेटी   देवाची ! ॥ ३ ॥ 
                - घुडनखापा दि . २९ - ०९ - १९५९