आवडीचा नाथ तू , तुझा रे अनाथ मी
( चाल : चौदवी का चाँद हो . . . )
आवडीचा नाथ तू , तुझा रे अनाथ मी ।
घाल भीक दर्शनाची , देइ मला साथ तू । । धृ । ।
तूच तू मनात ये , कोणी दुजा नसे ।
चित्त चिंतनी तुझ्या , निज ध्यास होतसे । ।
लोटू नको दूर अता , या दीनास तू ॥ १ ॥
जन्म - मरण दुःख हे , अता नको पुन्हा ।
कळली मनासी अता , घनघोर यातना । ।
म्हणुनीच तुझे पाय मी , धरिले प्रमाण तू ॥ २ ॥
सर्व सुखाचा धनी तू , दूसरा नसे कुणी ।
निश्चयासी घेउनी , बसलोच शांत मी । ।
तुकड्यादास दर्शनी तुझ्या , ठेवी निवांत तू ॥ ३ ॥