काय असा बसुनिया स्वस्थ तू ब्रिद गमविसि अपुले ?

(चाल: पतीत पावन नाम ऐकुनी..)
काय असा बसुनिया स्वस्थ तू ब्रिद गमविसि अपुले ?
सोड अता हयगयी जन्म ते तव वाया गेले ॥धृ0॥
घरफोडी करुनिया लुटारु जमले तुजपासी।
हो जागा अजुनिया गङ्या रे ! का झोपा घेशी ? ॥१॥
झापड ही मायेची बसवुन का बुडशी येथे ?
करी स्नान निर्मली जलाने   कर   निर्मल   माथे ॥२॥
तुकड्यादासा ठीक दिसेना या सुस्ती रमता।
हो जागृत बा !  सोड अता या निराश भव- पंथा ॥३॥