काय प्रसंग पातला I
काय प्रसंग पातला । देवा! कैसा जन्म दिला ? ॥ धृ ॥
जातो पशूचिया जन्मा । तरी बरे होते आम्हा ॥ १ ॥
नुरते मनी सारासार । भेसळ चाले हा व्यवहार ॥ २ ॥ तुकड्या म्हणेआमुच्याने । नोहे कर्तव्य पाळणे ॥ ३ ॥