काय उभा बोलना शीन कसा येईना ?
(चाल : घटा घनघोर घोर...)
काय उभा बोलना शीन कसा येईना ?
अजुनि का पाहिना ?
विठोबा । धीर अता राहिना रे । ॥धृ०॥
दौपदिला तू वस्त्र पुरविले संत सांगती ऐसे ।
आज जगाचे हाल पाहता न सुचे तुजला केसे ?
अन्न कुणी देईना हाक कुणी घेईना
अजूनि का पाहिना ?
विठोबा ! धीर अता राहिना रे ! ।।१।।
कुलधर्माची परंपरेची लाज पाहते जाया I
भक्तिमार्गही न रुचे लोकां काय सांगु यदुराया ।
दुःखविती भावना भक्ति करू देईन
अजूनि का पाहिना ?
विठोबा ! धीर अता राहिना रे ! ॥२॥
पुढे काय करशील कळेना काय काय होता हे I
तुलाच सगळे कळते सगुणा ! काय होय की नोहे I
तुकडयाची भावना क्लेश अता साहिना
अजूनि का पाहिना ?
विठोबा ! धीर अता राहिना रे ! ॥३॥