आता नका पाहू अंत I
आता नका पाहू अंत । देवा! घ्याहो पदरात ॥ धृ ॥
देह आर्पिला चरणा । ब्रीद राखी नारायणा! ॥ १ ॥
आम्ही सर्व भावे दीन । आलो तुजसी शरण ॥ २ ॥
तुकडया म्हणे वेळ गेली । पुढे चौऱ्यांशी लागली ॥ ३ ॥