आम्ही पक्षियाप्रमाने I
आम्ही पक्षियाप्रमाणे । नित्य नवे अमुचे जिणे ॥ धृ ॥
उडो मनाचिया मागे । जिकडे नेई तिकडे वेगे ॥ १ ॥
स्थिर न होयचि क्षणी । चित्त भ्रमे हे भ्रमणी ॥ २ ॥
तुकड्या म्हणे तू घरटे । होय तेव्हा पांग फिटे ॥ ३ ॥