क्षणी वाटे अनुताप I
क्षणी वाटे अनुताप । क्षणी मोहाचा संकल्प ॥ धृ ॥
मन जाते जये काळी । भूल पडते सगळी ॥ १ ॥
जरा वाटे चालू लागे । धावू लागे आडमार्गे ॥२ ॥
तुकड्या म्हणे ऐसी गति । देवा! आमुच्या संगती ॥ ३ ॥