निरखुनि बघ दयाघना! दीन अम्ही द्वारी तुझ्या
निरखुनि बघ दयाघना! दीन अम्ही द्वारी तुझ्या ।। बघ० |।धृ०।
सृष्टीतील खेळ नको, क्रूरांचा मेळ नको।
भ्रष्टवी मना ।। निरखूनि ०।।१॥।
मोहविते विषय-जाल, घालुनिया मोहमाळ ।
देत अवगुणा ।। निरखुनी० ।1२॥।
असतांना तू समोर, का होते पाप घोर?
चुकवि यातना ।| निरखुनि० ।।३॥।
तुकड्याची पुरवि आस, तोडी भव-मोह-पाश ।
पुरवि या पणा ।। निरखुनि० ।।४॥।|