उमेचा रमण स्वामी सत्य माझा

उमेचा रमण स्वामी सत्य माझा । पुरवितो काजा संकटीही ॥
करूनिया स्वारी येई   नंदीवरी । शिरी गंगा धरी, अंगी भस्म ।
आसन ते साथ  व्याघ्रांवर   घेत । स्मशानी राहत निशिटिनी ।।
म्हणे तुकड्यादास सोसवेना त्रास । करी रे ! उदास प्रपंचात ।