मनमोहन येणार, मंदिरी

मनमोहन येणार, मंदिरी ।। मनमोहन ०॥|धृ० ।।
मन्मानस - मंदीर साजिरे, आज धन्य होणार।।मं०।।१।।
हृद्यासन अति निर्मल,कोमल,त्यावरी प्रभु बसणार ।।मं०।।२॥।।
मोरमुकुट पीतांबर माला, वेजयंति खुलणार।।मं०।।३॥।
भावभक्तिचे पुष्प हरि-शिरी, माळ-फुले चढणार ।।।मं०।।४॥
नंदादीप सुशोभित चिन्मय, अखंडसा जळणार ।।मं०।।5।।
तूकडयादास म्हणे मंदिर हे, कृष्ण-रूप होणार ।।मं०।।6।।