उदरी आलासी सखया l धन्य हनुमंत राया

उदरी आलासी सखया ! । धन्य हनुमंत राया ! ॥
धन्य भाग्याचा महिमा । वश केले सखया रामा ।।
लंके लावियली आग । केला राक्षसाचा भंग ॥
तुकड्या म्हणे देई बोध । लाविलासी सीता शोध ॥