करुणाघना ! दीनपावना !

करुणाघना ! दीनपावना !
कुलभूषणा ! दे   दर्शना ।।धृ०।।
तुजवीण त्राता न कुणी अम्हाला, सुख दे मना।दे०।।१।।
भवसागरी दुःख नी भय भारी, सुध ना  मना । दे०।।२।।
गति तुकड्याची वाहो स्वरुपी,  पदि  याचना । दे0॥३॥