कुणी दत्त पाहिला का माझा ? अवधूत पाहिला का माझा ?
(चालः कुणि राम पाहिला का...)
कुणी दत्त पाहिला का माझा ? अवधूत पाहिला का माझा ? l।धृ०॥
दंड- कमंडलू त्रिशूल हाती, औदुंबर-तटि वास करी ।
पायी खडावा भस्म तनुवरि, भक्तांच्या धावे काजा ।।१॥
कोल्हापुरला मागत भिक्षा, वास करी माहुरधामा ।
स्नान करी जान्हवी तटाकी, योगिराज सदगुरुराजा l।२।।
जपता भावे प्रसन्न होई, फळ देई झणि धावुनिया ।
तुकड्यादासा आस तयाची, पुरविल तो अमुच्या काजा ।।३॥