उठे सुटे उजागर करी धर्माचा प्रचार

उठे सुटे उजागर ।
करी धर्माचा प्रचार ॥धृ॥
वित्ती दक्षणेची हाव । 
दावि लटीकाची भाव ॥1॥
परोपरी लोका बोले ।
पापं अंतरी बैसले  ॥2॥
तुकड्या म्हणे कैसे निभे ? । 
वेळी काळ होती उभे ॥3॥