आवडिचा मोहन हा, सोडु नये वाटे
(चाल: हरिभजनावीण काळ...)
आवडिचा मोहन हा, सोडु नये वाटे ।।धृ०।।
जीवभाव तोचि अम्हा, धनिकासी जेवी जमा ।
विसरताचि एक क्षण, अंगि येति काटे l।१॥
नेत्रि सगुण रूप सदा, वाटे सुख शांति-सुधा।
त्याविण ना गात जरा, क्षण न एक कंठे ।।२।।
मधुर ध्वनि बसंरिचा, नाश करी षड्-अरिचा।
बाग फुले या उरिचा, निर्मळ जल दाटे ।।३।।
तुकड्याचा देव एक, परि हा नटतो अनेक ।
त्या पदि मन हे निशंक, कमलामृत चाटे ।।४॥