क्षण एक धरीना धीर, कसे मन हे बावरे ।

(चालः यमुना जळि खेळू खेळ...
क्षण एक धरीना धीर, कसे मन हे बावरे ।
करु काय सुचेना काहि, जरा तरि ना आवरे ।।धृ॥
(अंतरा) जरि योग- याग बहु केले ।
मन पवन समाधी नेले ।
वनि निर्जनि घर बांधियले ।
तरि व्यर्थ तयांची कास, खास विपयी हावरे ।।१।।
(अंतरा) जगि तीर्थधामही नाना ।
दरिकंदरि ऋषिच्या स्थाना ।
जी मोहविती शरिरांना ।
ना राहि जरा टिकुनिया,   कुसंगाने   पाझरे ।।२।।
(अंतरा) अति पंथ- मतांतर लोकी।
परि आस  पुरेना एकी ।
जळजळती एकामेकी ।
नच शांति वृत्तिला येइ़, करी हृदया   कावरे ।।३॥
(अंतरा) सत्संग सुगम यासाठी ।
व्हावया वृत्ति उफराटी ।
परि बोध पाहिजे गाठी ।
विश्वास असा तुकड्यास, अनुभवा दे भाव रे ! ।।४।।