कधि अवतरशी भारत भूवर
कधि अवतरशी भारत भूवर? सख्या चापपाणी ?।
ऐक, ऐक बा! करुणा रामा! घे अपुल्या कानी |।धू० ।।
वेद्-शास्त्र-मर्यादा सगळी, विसरुनिया गेली।
माय-लेक की, बाप-पुत्र ही, याद नष्ट झाली।।१ ।।
अकालि रोगी मरती, क्षय-महारोगाची भरती ।
खाया न मिळे अन्न पुरेसे, पीकहि ना दे धरती।।२।।
असत्यता ही जिकडे तिकडे, प्रेम नसे कोठे ।
तुकड्यादास म्हणे जे बदलो, जरा नसे खोटे।।३॥।