कशाला केला सृष्टी-खेळ? जावया व्यर्थ तुझी ही वेळ

कशाला केला सृष्टी-खेळ? जावया व्यर्थ तुझी ही वेळ ।।धू० ।।
आम्ही होतो अपुल्या गावी, आम्हा पाठवले परगावी ।
मिळेना हरि! सौख्याचा मेळ, जावया व्यर्थ तुझी ही वेळ ।।१ ।।
नव्हती माया आम्हा ठावी, आता हरी दिसेना भावी ।
मधि आले द्वैताचे खेळ, जावया व्यर्थ तुझी ही वेळ ।।२॥।

 क्रोणी केली ऐसी हेळ? जावया व्यर्थ तुझी ही वेळ।।३।। ॒
तूकडयादास म्हणे गा देवा! तू-अम्ही होतो एका गावा ।
कोणी लाविली ऐसी चेळ? जावया व्यर्थ तुझी हि वेळ ।।4।।