आम्ही न पाहूचि दृष्टी I
आम्ही न पाहूचि दृष्टी । येरा, आणिकाचे दिठी ॥ धृ ॥
लक्ष लावू पांडुरंगी । रंगू तयाचिय रंगी ॥ १ ॥
ओस सर्व जग आम्हा । जव नाही भक्तिकामा ॥ २ ॥
तुकड्या म्हणे तोचि प्रेमी । राहे सर्वकाळ नामी ॥ ३ ॥