काय कधी होय कर्म I
काय कधी होय कर्म । कोण जाणे त्याचे वर्म ॥ धृ ॥
प्रभु पाहतो कसासी । आपुल्याचि भक्ताविषी ॥ १ ॥
लीला करूनि निराळा । ऐसा माझा हा सावळा ॥ २ ॥
तुकड्या म्हणे आम्ही दीन । मार्ग चालू न्याहाळून ॥ ३ ॥