कोठे कोठे पहाया जावे I
कोठे कोठे पहाया जावे । काय काय सांभाळावे? ॥ धृ ॥
नाही अपुलिया हाता । सकळ देवाची ही सत्ता ॥ १ ॥
काय घडेल कोठे कधी। आम्ही नेणो त्याची संधि ॥ २ ॥
तुकड्या म्हणे देवावर । सर्व सोडिला निर्धार ॥ ३ ॥