कोठे गेला सखा राम ? ज्याचे माझ्यावर प्रेम

कोठे गेला सखा राम ? । ज्याचे माझ्यावरी  प्रेम ॥
आता मज न पुसे कोणी । वेळ गेली ती निघोनी ॥
कृष्ण सखा होता गडी ।  गेला   क्षीरसागराथडी ॥
तुकड्या म्हणे मी अंकीत। अजुनी राहिलो दुःखात ॥