क्षीरसागरी बैसोनी

क्षीरसागरी बैसोनी । पाहसी अंत का अजुनी ? ॥
लाज राख माझी राया ! । ब्रीद जाईल रे ! वाया ॥
कोणी   नाही   तुजविण ।  मायबाप तूचि जाण ॥
तुकड्या म्हणे पाही पाही । शरण आलो लवलाही ॥